अमळनेर नगरपरिषद निवडणुक -२०२५
*नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार प्रा.डॉ. जयश्री साळुंके (दाभाडे मॅडम) निवडणूक रिंगणात*
*अमळनेर :* नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा अमळनेर नपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती साठी सर्वसाधारण राखीव जाहीर झाले आहे. या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित,अभ्यासू आणि सामाजिक प्रश्नांची, शहरी समस्यांची जाणीव असलेल्या एकमेव उमेदवार प्रा.डॉ.जयश्री साळुंके (दाभाडे मॅडम) यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. मागील २७ वर्षापासून अमळनेर शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न, समस्या त्यांनी कौशल्याने मार्गी लावल्या आहेत. अमळनेर मधील गोर गरीब सामान्य जनतेला सतत मदत करून त्यांच्यासाठी लढून न्याय मिळवून दिला आहे.
यात समाजातील सर्व समाजांच्या प्रश्नांचा समावेश आहे. कोणत्याही पदावर कार्यरत नसताना देखील नगर परिषद हद्दीतील किती तरी समस्या त्यांनी आपला अभ्यास, कायद्यांची जाणीव, सामाजिकतेचे भान या जोरावर सोडवल्या आहेत. सर्व सामान्य जनतेचा आवाज बनून जनतेला मदत केली आहे.
निष्कलंक कारकिर्द सुरू असताना अनेक समाज कंटकांनी त्यांना मार्गातून हटविण्याचा देखील प्रयत्न केला परंतु न डगमगता, न घाबरता अत्यंत संयम आणि शांततेत त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना केला आहे. आज त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची गरज असून आपली हक्काची ताई आपल्या कामांसाठी योग्य पदावर असणे आवश्यक आहे.
